पिंपरी | एसएनबीपी स्कूलना चार गटात जेतेपदे ; आंतरशालेय जिल्हा क्रीडा स्पर्धा

पिंपरी, (प्रतिनिधी) – एसएनबीपी, चिखली आणि एसएनबीपी, रहाटणी स्कूलनी तिसर्या एसएनबीपी आंतरशालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेत 12, 14 आणि 17 वर्षांखालील गटात मिळून चार विजेतेपदे पटकावली. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल,
चिखली येथे झालेल्या स्पर्धेत 12 वर्षांखालील मुले गटात एसएनबीपी चिकली ब संघाने त्यांच्याच अ संघाला 18 धावांनी हरवून विजेतेपद मिळविले. प्रत्येकी 7 षटकांच्या सामन्यात शर्व भगतने केलेल्या शानदार 18 धावा (13 चेंडू) त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
14 वर्षांखालील गटातही बाजी मारताना एसएनबीपी अ संघाने त्यांच्या ब संघावर एका धावेने मात केली. एसएनबीपी, रहाटनी संघाने मोरवाडी विंगचा 2 धावांनी पराभव करून 17 वर्षांखालील विजेतेपदावर नाव कोरले.एसएनबीपी, रहाटनी संघाने (सीबीएससी) 17 वर्षांखालील मुलींच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब करताना त्यांच्याच एसएससी बोर्ड संघावर 17 धावांनी विजय मिळवला.





