ICC ODI rankings | क्रमवारीत मानधनाची प्रगती

दुबई – आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या महिला फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या स्मृती मानधनाने प्रगती केली आहे. तीने या क्रमवारीत पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तीच्यासह भारताची कर्णधार मिताली राज हिने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे.
याआधी मानधनाने 2021 सालचा वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकवला होता. मानधनाने क्रमवारीत दोन स्थानांनी सुधारणा करत पाचव्या स्थानावर मजल मारली आहे. तिच्या खात्यात 710 रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाची एलिसा हीली 742 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचीच बेथ मूनी तिसऱ्या आणि एमी सॅंटरथवेट चौथ्या स्थानावर आहे.
महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत भारताची झुलन गोस्वामी 727 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताची दीप्ती शर्मा चौथ्या स्थानावर असून झुलन गोस्वामी या क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे.





