भाजपच्या नेत्या व केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मंत्री स्मृती इराणी यांचा सोशल मीडियावर सध्या करिअरच्या सुरवातीचा व्हिडियो चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर तुफान चर्चेत असलेला हा व्हिडियो एकता कपूरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
एकता कपूर आणि स्मृती इराणी यांच्यातील मैत्री आजही पाहायला मिळते. छोट्या पडद्यावर सर्वाधिक चाललेल्या मालिकेपैकी एक म्हणजे ‘क्यों की सास भी कभी बहु थी’ . कोणे एकेकाळी लोकप्रियतेचं सर्वोच्च शिखर या मालिकेनं गाठलं होतं. या मालिकेची सुरुवात २० वर्षांपूर्वी झाली होती. आठ वर्षे या मालिकेनं छोट्या पडद्यावर राज्य केलं. दोघीही अनेक वेळा सोशल मीडियावर एकमेकांप्रतीचं प्रेम आणि मैत्री व्यक्त करत असतात. यातच एकताने स्मृती यांचा १९९८ सालचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्मृती यांनी मिस इंडिया या स्पर्धेत भाग घेतला होता, त्यावेळी त्यांचा रॅम्पवॉक करतानाचा हा व्हिडीओ आहे.