Smriti Irani VS Priyanka Gandhi । लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून विजयी झाले होते. राहुल यांनी आता वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते रायबरेलीचे खासदार राहतील. काँग्रेसने प्रियंका गांधी यांना वायनाडमधून पोटनिवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतलाय. यासह गांधी परिवारातील आणखी एक सदस्य दक्षिणेतून निवडणुकीच्या राजकारणात उतरणार आहे. गांधी घराण्याचे दक्षिणेशी जुने नाते आहे. इंदिरा गांधी यांनी १९७८ मध्ये कर्नाटकातील चिकमंगळूरमधून पोटनिवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1980 मध्ये इंदिराजींनी आंध्रच्या मेडकमधून विजय मिळवला. 1999 मध्ये सोनिया गांधींनीही दक्षिणेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1999 मध्ये त्यांनी कर्नाटकातील अमेठी आणि बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही जागा जिंकल्या होत्या. मात्र, नंतर त्यांनी बेल्लारीची जागा सोडली. वायनाडमधून भाजप स्मृती इराणींवर बाजी मारणार? Smriti Irani VS Priyanka Gandhi । प्रियंका गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या जागेवरून भाजप कोणाला उमेदवारी देणार याची सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. अशीही चर्चा आहे की भाजप वायनाड मतदारसंघातून स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊ शकते. स्मृती इराणी या वेळी अमेठीतून केएल शर्मा यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या असल्या तरी 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून राहुल गांधींचा पराभव केला होता. अशा स्थितीत भाजप त्यांना या जागेवरून रिंगणात उतरवून लढत रंजक बनवू शकते. 1999 मध्ये सुषमा स्वराज विरुद्ध सोनिया गांधी निवडणूक Smriti Irani VS Priyanka Gandhi । भाजपने यापूर्वीही तिकिटांबाबत आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. 1999 मध्ये बेल्लारीतून सोनिया गांधींच्या पदार्पणाची बातमी समोर आल्यावर भाजपने या जागेवरून सुषमा स्वराज यांना तिकीट देऊन निवडणूक रंजक बनवली होती. या जागेवर सुषमा यांनी सोनिया गांधींना कडवी टक्कर दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सोनिया गांधींना 414000 मते मिळाली. तर सुषमा स्वराज यांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. सोनिया गांधींना ही निवडणूक जवळपास 56000 मतांनी जिंकता आली. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप 1999 चा पॅटर्न राबवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.