Smriti Irani: स्मृती इराणीचा टीआरपीवर दबदबा; टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली…

Smriti Irani : स्मृती इराणी टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.‘अनुपमा’ आणि ‘जेठालाल’लाही स्मृती यांनी मागे टाकलं आहे.‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ मधून स्मृती इराणीने छोट्या पडद्यावर जोरदार पुनरागमन केलं आहे.
प्रेक्षकांनी त्यांचं स्वागत उत्साहात केलं असून, पहिल्याच आठवड्यात त्यांच्या मालिकेने टीआरपीत ‘अनुपमा’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ला मागे टाकलं आहे. त्यामुळे ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
रिपोर्टनुसार, स्मृती इराणी एका एपिसोडसाठी तब्बल 14 लाख रुपये मानधन घेत आहेत. त्यामुळे त्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री बनल्या आहेत. स्वतः स्मृती इराणीनेही हे मान्य करत सांगितलं की, ही कमाई त्यांनी मेहनत आणि चांगल्या टीआरपीमुळे मिळवली आहे.
स्मृती म्हणाल्या, “आपण आकडे आणि उत्पन्नाच्या बाबतीत नवा इतिहास घडवला असेल, तर त्याप्रमाणे मानधन मिळणं साहजिकच आहे. आपल्या कामाच्या करारावर आपण चर्चा करू शकतो, हे लोकांना माहिती नसतं.” त्यांनी अभिमानाने सांगितलं की, त्यांनी फक्त महिलांच्याच नव्हे तर पुरुषांच्याही मानधनाला मागे टाकलं आहे.
स्मृती इराणी यांनी असंही सांगितलं की, त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांनाही त्यांनी स्टार बनवलं आहे. “खरा स्टार तोच जो आपल्या सोबतच्या लोकांना देखील उंचीवर घेऊन जाईल,” असं त्या म्हणाल्या. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ मधून त्यांनी हे साध्य केल्याचं त्यांनी सांगितलं.





