Smartphone: भारतामध्ये स्मार्टफोन ( SmartPhone) खरेदी करण्याची पद्धत वेगाने बदलत आहे. आधी लोक मोबाईल घेताना कॅमेरा, बॅटरी, रॅम किंवा प्रोसेसर याकडे जास्त लक्ष देत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. फ्लिपकार्ट आणि काउंटरपॉइंट रिसर्च यांच्या ‘स्मार्टफोन इनसाइट्स रिपोर्ट 2026’नुसार, आता सुमारे 89 टक्के लोक स्मार्टफोन खरेदी करताना AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) फीचर्सला सर्वात जास्त महत्त्व देत आहेत. (Smartphone) या रिपोर्टनुसार, AI फीचर्स आता लक्झरी नसून दैनंदिन गरज बनले आहेत. व्हॉइस असिस्टंट, स्मार्ट सर्च, कंटेंट तयार करणे, फोटो एडिटिंग आणि वैयक्तिक गरजेनुसार फोन वापरणे या सगळ्या गोष्टी AI मुळे सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आता फोन घेताना हे फीचर्स आहेत का, याकडे विशेष लक्ष देत आहेत. (Smartphone) विशेष म्हणजे, फक्त महागड्या फ्लॅगशिप फोनमध्येच नाही तर 15,000 ते 20,000 रुपयांच्या बजेटमध्येही लोक AI फीचर्सची अपेक्षा करत आहेत. रिपोर्टनुसार, GenAI (जनरेटिव AI) असलेल्या स्मार्टफोनचा वापरही वाढत असून त्याचा दर सुमारे 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. (Smartphone) महागडे स्मार्टफोन घेण्याचा ट्रेंडही वाढत आहे. मात्र, सर्वांकडे एकदम पैसे नसल्याने सुमारे 33 टक्के लोक EMI च्या मदतीने प्रीमियम फोन खरेदी करत आहेत. तरीही किंमत हा अजूनही सर्वात महत्त्वाचा घटक आहे. रिपोर्टनुसार, 60 टक्के ग्राहक “वॅल्यू फॉर मनी” पाहतात, 57 टक्के लोक ब्रँडवर विश्वास ठेवतात, तर 56 टक्के ग्राहक ऑनलाइन रिव्ह्यू वाचून निर्णय घेतात. (Smartphone) smartphones वयोगटानुसार AI चा वापर वेगवेगळा दिसून येतो. Gen Z पिढी AI चा वापर मुख्यतः सोशल मीडिया, कंटेंट क्रिएशन आणि मनोरंजनासाठी करते. तर मिलेनियल्स AI चा वापर ऑफिस काम, प्लॅनिंग आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी जास्त करतात. महिलांमध्ये AI फीचर्सचा वापर दैनंदिन जीवन, लाइफस्टाइल आणि वैयक्तिक गरजांसाठी अधिक केला जातो. याशिवाय, स्मार्टफोनचा डिझाइन आणि रंग यालाही मोठे महत्त्व मिळत आहे. सुमारे 64 टक्के ग्राहक स्टायलिश आणि रंगीत फोन पसंत करतात. काही लोक तर आवडत्या डिझाइनसाठी 5 टक्क्यांपर्यंत जास्त पैसे द्यायलाही तयार असतात. हा ट्रेंड विशेषतः तरुण, महिला आणि छोट्या शहरांमध्ये जास्त दिसून येतो. (Smartphone) तज्ज्ञांच्या मते, आजचे ग्राहक फक्त फीचर्स नाही तर एकूण अनुभव पाहतात. फोन वेगवान असावा, वापरण्यास सोपा असावा आणि AI फीचर्समुळे रोजच्या कामात मदत व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे भविष्यात स्मार्टफोन बाजारात AI अधिक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.