satara | सुखाचे छोटे छोटे क्षण समाधान मिळवून देतात : भोईटे

वडूज, (प्रतिनिधी) – हल्ली समाजात प्रत्येकजण दु:खाचं गार्हाणं गात आहे. खरं सुख कशात आहे, हे त्याला समजत नाही. सुखाचे क्षण अगदी छोटे असतात पण ते समाधान मिळवून देतात, अशाच प्रकारे पुरस्कार हा आयुष्यातील सुखाचाच एक क्षण आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरु अशोकराव भोईटे यांनी केले. श्री दत्तसंस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवार सातारा यांच्यावतीने सातार्यातील सिद्धीविनायक हॉल येथे आयोजित विविध पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु-सिख्ख परिषदेचे उपाध्यक्ष नामदेव महाराज हरण, आसुर्ले येथील महामंडलेश्वर स्वामी आनंद काडसिद्धेश्वर, सातार्यातील आंतरराष्ट्रीय कृष्णभवनामृत संघाचे बिपिन बिहारी दासप्रभू, क्षितेश्वर महाराज, कल्याण कुलकर्णी, अध्यक्ष वि. म. काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नामदेव हरड महाराज म्हणाले, उत्तुंग भरारी घेण्यासाठी पाठीवर थाप मारणारा कोणीतरी पाहिजे. काळे सरांनी राबवलेला उपक्रम चांगला आहे. सुखाची आपण अपेक्षा करतो. पावलोपावली दु:ख आहे. ती दु:खाची यातना भोगत असताना आपल्याला आनंद मिळतो तो आपला सन्मान आहे.
धनंजय क्षीरसागर म्हणाले, आज प्रत्येक मनुष्य आनंद शोधतोय. अशा परिस्थितीत पुरस्कार मिळाला, पाठीवर थाप टाकली तर आनंद मिळतो. काळे सरांनी अनेक कुटुंबांचा आनंद द्विगुणीत केला. काळे सरांकडून सुरु असलेले समाजोपयोगी काम कौतुकास्पद आहे.
यावेळी आत्ममंडलेश्वर महाराज, बिपिन बिहारी दास यांनी मार्गदर्शन केले. पत्रकार धनंजय क्षीरसागर, संदीप कुलकर्णी, वेद सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर यांच्यासह प्रमोद झांबरे आसू, प्रा. रविंद्र व उज्वला ठोके, उद्योजक रामदास व शीतल सरगर, प्रा. सुरेश महामुलकर, प्रा. उत्तमराव कदम, किर्ती सुनील पाटणे, डॉ. सुहास पोळ, जिजाबा गावडे, सौ. कारखानीस, नम्रता जाधव,
श्रवण जोशी, किर्तनकार विलास गरवारे, उदयसिंह पाटील, हेमंत मेहते, प्रा. उत्तमराव कदम, कौसल्या कदम, रमेश भंदिर्गे, श्रीकृष्ण पाटणे, अॅड. जनार्दन नारायण कर्पे, हृषिकेश ढाने, डॉ. हर्षदा सुनिल पाटणे, बाळासाहेब तालुगडे, चित्तरंजन खटावकर, संजय घोरपडे, रमेश भिलारे, साईनाथ रामपुरकर,
तानाजी फणसे, किसनराव बोंबळे, अनंत बाचकळे, प्रतिभा पवार जलगावकर, भूषण ठाकरे, मारुती कदम,श दिलीप जाधव, सोमनाथ जाधव, विशाखा काळे यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रा. दशरथ जाधव यांनी सुत्रसंचालन केले. सुनील पाटणे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.
पाच खटावकरांचा सन्मान
या कार्यक्रमात खटाव तालुक्यातील जेष्ठ पत्रकार धनंजय क्षीरसागर (वाकेश्वर), संdiप कुलकर्णी (चितळी) यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार, तर वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर (वरुड), ह.भ.प. विलास गरवारे, श्रवण जोशी (दोघेही सिध्देश्वर कुरोली) यांना सन्मानित करण्यात आले.





