पुणे जिल्हा | इंदापूर तालुक्यातील लहान, मोठी कामे लावली मार्गी

इंदापूर, (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी,रविवारी (दि.१६) रोजी जनता दरबारास इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक लहान-मोठी तालुक्यातील कामे आमदार दत्तात्रय भरणे यांनी या जनता दरबारात मार्गी लावली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, अनेक वर्षांपासून शनिवारी रविवारी तालुक्यातील नागरिक,आपल्या समस्या लहान – मोठी कामे घेऊन येत असतात. शेतकरी ग्रामीण भागातील नागरिकांना उगीच पुणे,मुंबईला हेलपाटे घालण्यापेक्षा,थेट जनता दरबारातच त्यांच्या कामाचा निपटारा केला जातो.शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, गावागावातील नागरिकांच्या समस्या, विद्यार्थी व युवकांचे प्रश्न तसेच सामाजिक प्रश्न,यावरती काम करताना आनंद वाटतो.
शासनाच्या सर्वच विभागातील कामे गावाकडील नागरिक तात्काळ करू शकत नाहीत.मात्र जनता दरबाराच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न निकाली निघत आहेत.तालुक्याचा लोकप्रतिनिधी असल्याने कोणताही राजकीय पक्ष,गट तट न पाहता,केलेली कामे मनाला आनंद देतात.तालुक्यातील कोणतेही नागरिकाने,सामाजिक प्रश्न,गावातील मूलभूत प्रश्न,यासंदर्भात कोणतेही काम असेल तर थेट संपर्क करावा, असेही आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले.





