लोकप्रिय ‘Skype’ होणार कायमचे ‘Shutdown’ ! मायक्रोसॉफ्टने घेतला मोठा निर्णय ; २२ वर्षानंतर अचानक का घेतंय निरोप? जाणून घ्या

Skype Shutdown । २००३ मध्ये लाँच झालेले स्काईप हे एकेकाळी व्हिडिओ कॉलिंगच्या जगात सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म मानले जात होते. ज्या काळात व्हिडिओ कॉलिंग ही एक नवीन गोष्ट होती, त्या काळात स्काईप लोकांना एकमेकांशी जोडण्यात मोठा दुवा ठरत होता. पण काळानुसार तंत्रज्ञान बदलले आणि आता त्याची जागा नवीन साधनांनी घेतली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने आता अधिकृतपणे घोषणा करत “येत्या ५ मे २०२५ रोजी स्काईप सेवा कायमची बंद केली जाईल.” असे म्हटले आहे.
आता मायक्रोसॉफ्टचे लक्ष Teams वर Skype Shutdown ।
मायक्रोसॉफ्टने २०११ मध्ये स्काईप विकत घेतले आणि तेव्हापासून ते व्हिडिओ कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी एक विश्वसनीय साधन बनले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत, मायक्रोसॉफ्टने हळूहळू त्यांच्या नवीन प्लॅटफॉर्म मायक्रोसॉफ्ट Teams वर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः घरून काम करण्याच्या आणि ऑनलाइन बैठकांच्या वाढत्या ट्रेंडमुळे, Teamsची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. मायक्रोसॉफ्ट आता स्काईप पूर्णपणे बंद करू इच्छिते आणि Teamsला प्राथमिक प्लॅटफॉर्म बनवू इच्छिते. कंपनी केवळ ऑफिस आणि व्यावसायिक वापरासाठीच नाही तर वैयक्तिक वापरासाठी देखील Teams चा प्रचार करत आहे.
स्काईप वापरकर्त्यांसाठी कोणते पर्याय ? Skype Shutdown ।
सध्याच्या स्काईप वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट Teamsमध्ये जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच, मायक्रोसॉफ्ट गेल्या काही काळापासून स्काईप वापरकर्त्यांना सूचना आणि अलर्टद्वारे या बदलाची माहिती देत आहे. जे लोक स्काईपचा पेड प्लॅन वापरत आहेत ते त्यांच्या पुढील नूतनीकरण तारखेपर्यंत ते वापरू शकतात. त्यांची वैधता संपताच, खाते देखील बंद केले जाईल. त्याच वेळी, नवीन वापरकर्त्यांसाठी स्काईप क्रेडिट आणि कॉलिंग योजना आधीच बंद करण्यात आल्या आहेत.





