Skin Care Tips: महागड्या फेसवॉशला करा बाय-बाय, घरच्या वस्तूंनीच चेहरा ठेवा स्वच्छ
Skin Care Tips: आजकाल बाजारात मिळणाऱ्या अनेक फेसवॉशमध्ये केमिकल्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे काही दिवसांनी त्वचा कोरडी, निस्तेज किंवा संवेदनशील होऊ शकते. त्यामुळे अनेक जण आता नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय शोधत आहेत. अशा वेळी आपल्या स्वयंपाकघरातच असलेल्या काही साध्या गोष्टी फेसवॉशचा उत्तम पर्याय ठरू शकतात.

Skin Care Tips: आजकाल बाजारात मिळणाऱ्या अनेक फेसवॉशमध्ये केमिकल्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे काही दिवसांनी त्वचा कोरडी, निस्तेज किंवा संवेदनशील होऊ शकते. त्यामुळे अनेक जण आता नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय शोधत आहेत. अशा वेळी आपल्या स्वयंपाकघरातच असलेल्या काही साध्या गोष्टी फेसवॉशचा उत्तम पर्याय ठरू शकतात.
या घरगुती उपायांमुळे त्वचा स्वच्छ राहते, पिंपल्स कमी होतात आणि नैसर्गिक चमक येते. विशेष म्हणजे हे उपाय स्वस्त, सहज उपलब्ध आणि बहुतेक सर्व स्किन टाइपसाठी उपयुक्त आहेत.
बेसन
बेसन हे एक उत्तम नैसर्गिक क्लेंजर आहे. ते चेहऱ्यावरील मळ, घाम आणि अतिरिक्त तेल काढून टाकते.
कसं वापरायचं?
१ चमचा बेसनात थोडं पाणी, गुलाबजल किंवा दूध मिसळून पातळ पेस्ट करा. ओल्या चेहऱ्यावर लावून १–२ मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि पाण्याने धुवा. हे ऑयली आणि नॉर्मल स्किनसाठी फायदेशीर आहे.
)
Besan Face wash
मध
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरचे जंतू नष्ट करतात. त्वचा मऊ आणि ओलसर ठेवण्यास मदत होते.
कसं वापरायचं?
थोडा शुद्ध मध ओल्या चेहऱ्यावर लावून हलकी मसाज करा आणि १ मिनिटानंतर पाण्याने धुवा. ड्राय आणि सेंसिटिव्ह स्किनसाठी हा उपाय उत्तम आहे.
दूध
कच्चं दूध त्वचेला स्वच्छ करण्यासोबतच पोषणही देतं. यामधील लॅक्टिक अॅसिड मृत पेशी काढून टाकून त्वचेला नैसर्गिक चमक देतं.
कसं वापरायचं?
कापसाचा बोळा कच्च्या दुधात भिजवून चेहरा हलक्या हाताने पुसा आणि नंतर पाण्याने धुवा. ड्राय आणि निस्तेज त्वचेसाठी उपयुक्त.

Skin Care Tips
मुल्तानी माती
मुल्तानी माती ऑयली आणि पिंपल्स असलेल्या त्वचेसाठी खूप चांगली आहे. ती अतिरिक्त तेल शोषून घेते आणि पोअर्स स्वच्छ करते.
कसं वापरायचं?
१ चमचा मुल्तानी माती गुलाबजल किंवा पाण्यात मिसळून पातळ करा. चेहऱ्यावर लावून हलकी मसाज करा आणि सुकण्याआधी धुवा.

Multani Mitti
एलोवेरा जेल
एलोवेरा जेल त्वचेला हायड्रेट ठेवतो आणि जळजळ, खाज, लालसरपणा कमी करतो.
कसं वापरायचं?
ताजं एलोवेरा जेल ओल्या चेहऱ्यावर लावून हलक मसाज करा आणि नंतर पाण्याने धुवा. हे सर्व स्किन टाइपसाठी सुरक्षित आहे.





