Skin Care: चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी अनेकजण महागडी स्किन केअर (Skin Care) उत्पादने वापरतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, सुंदर त्वचेचे रहस्य हे फक्त बाहेरून नाही तर शरीराच्या आतल्या आरोग्यातही दडलेले असते. त्यामुळे योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे मानले जाते. उन्हाळ्यात सहज उपलब्ध होणारा आंबा हा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर फळ मानला जातो. तज्ज्ञ सांगतात की, आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे व्हिटॅमिन ( vitamin) शरीरातील कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. कोलेजन हे शरीरातील एक महत्त्वाचे प्रोटीन आहे, जे त्वचेला घट्टपणा, चमक आणि तरुणपणा टिकवून ठेवण्यास मदत करते. वयाच्या २५ वर्षांनंतर शरीरातील कोलेजनचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे सुरकुत्या, त्वचेवरील डाग आणि एजिंगची चिन्हे दिसू लागतात. (Skin Care) तज्ज्ञांच्या मते, धूम्रपान, जास्त साखर खाणे आणि खराब जीवनशैलीमुळेही कोलेजनचे उत्पादन कमी होऊ शकते. अशावेळी आंब्यासारखी व्हिटॅमिन सीयुक्त फळे खाणे फायदेशीर ठरते. Skin Care: स्वस्तात मिळणारा आंबा ठरतोय स्किनसाठी वरदान! नैसर्गिकरित्या वाढवतो कोलेजन आंब्यामध्ये फक्त व्हिटॅमिन सीच नाही तर व्हिटॅमिन ए, फायबर आणि अनेक पोषक घटकही असतात. हे घटक त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच आंबा शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे त्वचा अधिक हायड्रेटेड आणि तजेलदार दिसू शकते. (Skin Care) आंबा खाण्याचे अनेक प्रकार आहेत. अनेकांना आंब्याचा शेक आवडतो. दूध आणि आंबा एकत्र करून तयार केलेला शेक चविष्ट आणि पौष्टिक मानला जातो. त्यात ड्रायफ्रूट्स घातल्यास तो आणखी हेल्दी बनतो. मात्र तज्ज्ञांच्या मते, कोणतीही गोष्ट मर्यादित प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. (Skin Care) आंबा खाण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे तो कापून थेट खाणे. भारतात आंब्याच्या अनेक जाती उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाची चव वेगळी असते. तज्ज्ञांच्या मते, सकाळी मधल्या वेळेत किंवा संध्याकाळी चारच्या सुमारास आंबा खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. रात्री जेवणानंतर आंबा खाणे टाळावे, कारण त्यामुळे काहींना पचनाचा त्रास होऊ शकतो. याशिवाय आंब्याचे पन्हे, लोणचे किंवा इतर पदार्थ बनवूनही त्याचा आहारात समावेश करता येतो. योग्य प्रमाणात आंबा खाल्ल्यास त्वचा, आरोग्य आणि शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.