Pune District : नांदी फाउंडेशनच्या ‘नन्हीं कली’ उपक्रमांतर्गत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कौशल्य विकास शिबिर
Pune District : याचबरोबर विद्यार्थिनींच्या पालकांसाठी ‘Parenting Session’ आयोजित करण्यात आले. या सत्रामध्ये पालकांनी मुलींशी प्रभावी संवाद कसा साधावा, त्यांच्या भावनिक व शैक्षणिक गरजा कशा समजून घ्याव्यात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला कशा प्रकारे प्रोत्साहन द्यावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ओझर : नांदी फाउंडेशन अंतर्गत ‘नन्हीं कली’ उपक्रमाच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कूल, शिरोली बुद्रुक येथे दि. ३ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थिनींसाठी स्किल डेव्हलपमेंट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात इयत्ता ६वी ते १०वीच्या एकूण १४० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन व उपक्रम घेण्यात आले. शिबिरामध्ये जीवन कौशल्ये, डिजिटल स्किल, फायनान्शियल लिटरसी (आर्थिक साक्षरता), व्यक्तिमत्त्व विकास आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता, संवादकौशल्य, आर्थिक व्यवहाराचे ज्ञान तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
याचबरोबर विद्यार्थिनींच्या पालकांसाठी ‘Parenting Session’ आयोजित करण्यात आले. या सत्रामध्ये पालकांनी मुलींशी प्रभावी संवाद कसा साधावा, त्यांच्या भावनिक व शैक्षणिक गरजा कशा समजून घ्याव्यात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला कशा प्रकारे प्रोत्साहन द्यावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी रवींद्र जाधव, रघुनाथ डांगे व आदित्य सातपुते यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सायली भालेराव यांनी समन्वयक म्हणून शिबिराचे नियोजन व आयोजन केले.
नांदी फाउंडेशनच्या ‘नन्हीं कली’ उपक्रमातून विद्यार्थिनींना शैक्षणिक ज्ञानासोबतच जीवनात आवश्यक असलेली कौशल्ये मिळत असून, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व स्वावलंबनाची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.
समारोप कार्यक्रमा दरम्यान शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष निलेश थोरवे, सदस्य स्वप्नील लोहकरे, सखी सवित्री समिती सदस्य, बहुसंख्य पालक वर्ग ज्येष्ठ शिक्षिका शोभा कवडे आणि प्रियांका पादीर उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे, पर्यवेक्षक राजकुमार गंभीर यांचे मार्गदर्शन लाभले.





