तडीपार असतानाही शहरात आढळून आल्याने सराईताला सहा महिने सक्तमजुरी

पुणे – तडीपार असतानाही आदेशाचा भंग करून शहरात आढळून आलेल्या सराईताला चार वेगवेगळ्या गुन्ह्यात सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना पानसरे यांनी हा आदेश दिला. दंड न भरल्यास अतिरिक्त 15 दिवसाचा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

अर्जून कैलास मलके (वय 33, रा. येरवडा) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली. त्याला पोलिसांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातून 18 डिसेंबर 2013 पासून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यानंतर चार वेळा तो येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतच मिळून आला. पहिल्यांदा 8 मार्च आणि दुसऱ्यांदा 25 जुलै 2014 रोजी येरवडा येथील भाजी मंडई परिसरात, तर 27 ऑक्‍टोबर 2014 रोजी चित्रा चौक आणि 14 नोव्हेंबर 2014 रोजी कंजारभाट वस्ती येथे आढळून आला. त्यावर तपास करून येरवडा पोलिसांनी चार वेगवेगळी दोषारोपपत्र दाखल केली. त्यावर तो सराईत गुन्हेगार आहे. विनापरवाना शहरात आढळून आला आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने शिक्षा सुनावली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.