Nagpur News | औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरात महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली.जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले आहेत.
नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. त्यानंतर आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी यासंदर्भात आदेश जारी करुन पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याचे म्हटलं आहे.
तसेच ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांची आम्ही ओळख पटवत आहोत. या घटनेत ३३ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी चांगले काम केले आहे. ज्यांची ओळख पटवली जात आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर सर्व संबंधित कलमे लागू केली जातील,” असा इशाराही सिंगल यांनी दिला आहे. Nagpur News |
#WATCH | On yesterday’s clash and violence, Nagpur Police Commissioner Dr Ravinder Singal says, “The situation is under control and peaceful in Nagpur. More than 50 people have been taken into custody. We are identifying those who harmed public property. 33 police personnel were… pic.twitter.com/QVlQ5kBts2
— ANI (@ANI) March 18, 2025
कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारंबदी लागू करण्यात आली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना प्रभावित भागातील रस्ते बंद करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणारा कोणीही भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत दंडनीय राहील. Nagpur News |
दरम्यान, महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. तसेच पोलिसांनी शांतता राखण्याचे, कायदा-सुव्यवस्थेत सहकार्य करण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. Nagpur News |
दरम्यान, महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज (दि. 18) सकाळी 10 वाजता नागपूर येथे आले आहेत. ते महाल भागात घटनास्थळी पाहणी करणार आहेत. यानंतर ते प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा: