वाघोली : शिरसवडी (तालुका हवेली) येथील प्रिकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीमा नदी वरून सुरू असणारा बेकादेशीर पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.
दैनिक प्रभात ने याबाबत दि.१३ रोजी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ग्रामपंचायत शिरसवडी यांनी भीमा नदी वरून होणारा कंपनीला पाणीपुरवठा तातडीने बंद केला आहे. व ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी फक्त पाणी पुरवठा चालू ठेवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे भीमा नदीवरून होणारा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याबाबत माजी उपसरपंच बाळासाहेब गावडे यांनी निवेदन दिले होते.
ग्रामपंचायतीच्या परस्पर बेकायदेशीरपणे दि. २० रोजी प्रिकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजर रंजन राऊत यांनी ग्रामपंचायत शिरसवडीच्या पाणीपुरवठ्याच्या पंप हाऊसचे कुलूप तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच लता ज्ञानोबा गावडे, उपसरपंच रमेश कदम यांनी तक्रार दिली आहे.
दैनिक प्रभातने या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल नागरिकांनी प्रभातचे आभार मानले आहे.