SIR : एसआयआर मोहिमेस आणखी मुदतवाढ

SIR : केंद्रीय निवडणुक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमास १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून गृहभेटींचा कालावधी ३० जून ते १७ ऑगस्ट असा राहणार आहे. मतदार याद्यांचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून, त्यावरील सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण केली जाईल. अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदार याद्यांमधील काही मतदारांच्या पत्त्यांची माहिती अपुरी किंवा संक्षिप्त स्वरूपात नोंदविण्यात आलेली होती. त्यामुळे अशा मतदारांनी स्वतःहून आपल्या क्षेत्रातील बीएलओ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.





