गायिका पलकने 3000 मुलांना दिले जीवनदान; देशभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

Palak Muchhal| मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सामाजिक क्षेत्रात देखील सक्रिय असल्याचे दिसतात. यातच आता गायिका पलक मुच्छाल हिने एक दोन नाही तर तब्बल तीन हजार मुलांची मदत केली आहे. या मुलांची हार्ट सर्जरी करत पलकने त्यांना जीवनदान दिले आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यानंतर तिच्या कार्याचे सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पलकने आतापर्यंत 3000 मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या असून त्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. अजूनही काही मुलांची शस्त्रक्रिया बाकी असून लवकच तेही त्यांच्या कुटुंबासोबत चांगले आयुष्य जगतील असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे. याबद्दल बोलताना पलक म्हणाली, “मी केलेल्या प्रत्येक मैफिलीतून मिळणारे उत्पन्न ज्यांच्या पालकांना परवडत नाही, अशा मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी वापरले जाते. ती माझ्यावर जबाबदारी असल्यासारखी वाटते. यासाठी देवाने माझी निवड केली याचा मला खूप आनंद आहे.”
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, “”जेव्हा माझ्याकडे चित्रपट संगीताचे काम नव्हते तेव्हा मी प्रत्येकी तीन तास गाायचे आणि मुलांसाठी पैसेही गोळा करायचे. जसजशी माझी गाणी लोकप्रिय होऊ लागली, तशी माझी फी वाढू लागली, मी इतके पैसे कमवू लागलो की एकाच वेळी 13-14 मुलांच्या शस्त्रक्रियांना निधी मिळू लागला. या समाजात काही संवेदनशील माणसं आहेत ज्यांना आपल्या समाजाचं आणि देशाचं हित महत्त्वाचं वाटते. म्हणून मी तेच करत राहिले.”
विशेष म्हणजे वयाच्या सातव्या वर्षापासून पलक या सामाजिक कार्यात सक्रिय आहे. तिच्या या समाज कार्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. Palak Muchhal|
हेही वाचा:





