मुंबई – पार्टी आणि बॉलिवूडच जणू काही घट्ट नातं आहे. सिनेमा किंवा शो हिट झाला कि पार्टी,दिवाळी आलीं की पार्टी आणि एखाद्या स्टारचा जन्मदिवस असला तरी पार्टीच. अशाच एका गायिकेच्या बर्थडे पार्टीची व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. ही गायिका म्हणजे स्टार नेहा भसीन. स्टार यासाठी म्हंटल की नेहा जेव्हापासून बिग बॉसच्या घरात जाऊन आली आहे तेव्हापासून ती गायिकेसोबतच एक स्टार देखील झाली आहे.
नुकतीच नेहा ४० वर्षांची झाली. आपल्या बर्थडे निमित्त नेहाने सर्व मित्रमंडळींना मोठी पार्टी दिल्याचे समजते. एव्हडेच नाही तर नेहाने या पार्टीमध्ये जोरदार डान्स देखील केल्याचे समजते. या पार्टीतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पार्टीमध्ये नेहा ट्रान्सपर्यंत ड्रेसमध्ये बोल्ड दिसत होती. यावेळी नेहाने टेबलवर चढून बेधुंद डान्स केल्याचे देखील व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. यावेळी ती इतकी बेधुंद होऊन नाचताना दिसली कि टेबलवरील ग्लासकडे काय पण स्वतः घातलेल्या ड्रेसकडे देखील तिचे लक्ष नव्हते.
#NehaBhasin 💃🕵️❤️❤️ @viralbhayani77 pic.twitter.com/FTiK6f6wx0
— Viral Bhayani (@viralbhayani77) November 18, 2022
नेहा दुसऱ्यांदा ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आली आहे. या आधी देखील नेहाने आपल्या इंस्टाग्रामवर एक बोल्ड व्हिडीओ टाकला होता जो चाहत्यांना आवडला नव्हता. आता देखील नेहाने केलेल्या या बोल्ड डान्समुळे अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.