गायक अरमान मलिक अडकला विवाहबंधनात, वयाने मोठ्या गर्लफ्रेंडशी केले लग्न; पाहा फोटो

Singer Armaan Malik gets married: बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गाणारा गायक अरमान मलिक विवाहबंधनात अडकला आहे. अरमानने त्याची प्रेयसी आशना श्रॉफसोबत लग्न केले आहे. दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
अरमान आणि आशना हे 2017 पासून एकमेकांना डेट करत होते. ऑगस्ट 2023 मध्ये त्यांनी साखरपुडा देखील केला आहे. अखेर 2 जानेवारी 2025 ला दोघांनी नातेवाईकांच्या उपस्थित लग्न केले. विशेष म्हणजे अरमानची पत्नी त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. अरमानचे वय 29 वर्ष आहे, तर आशना 31 वर्षांची आहे.
View this post on Instagram
‘तू ही मेरा घर’, अशा कॅप्शनसह अरमानने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अरमानची पत्नी आशना एक फॅशन आणि ब्युटीब्लॉगर, तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिला कॉस्मोपॉलिटन लग्झरी फॅशन इन्फ्लुएन्सर ऑफ द इअर 2023 पुरस्कार देखील मिळाला होता. इंस्टाग्रामवर तिचे 1 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तिने द स्नोब शॉप नावाने ऑनलाइन बिझनेसही सुरू केला होता. आशनाने मुंबईतील एमआयटी कॉलेजमधून पदवीपर्यंतचे आणि त्यानंतर न्यूझीलंड टर्शरी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे.

