सिंधुदुर्गात कोरोना फोफावतोय! कोरोनाचा पाचवा रूग्ण आढळला

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईहून आलेल्या तरुणीला कोरोनाची बाधा झाली होती. ही तरुणी तिच्या कुटुंबीयांसोबत जिल्ह्यात आली होती.

त्यानंतर एका आंब्याच्या ट्रक चालका कोरोना पाॅझिटीव्ह आढळला होता. त्याचदरम्यान आज देवगड येथील एका 51 वर्षीय महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे. पाच पैकी 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे सुरु आहे. या सगळ्यामुळे आता जिल्ह्यात धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.