मोठी बातमी ! सिक्कीममध्ये लष्करी छावणीवर भूस्खलन ; ३ जणांचा मृत्यू तर ९ सैनिक बेपत्ता

Sikkim Army Camp Landslide। ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रविवारी संध्याकाळी सिक्कीममधील एका लष्करी छावणीत भूस्खलन झाल्याने काही सैनिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. नऊ सैनिक देखील बेपत्ता आहेत, ज्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू आहे असे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ७ वाजता उत्तर सिक्कीममधील चट्टन येथील लष्करी छावणीत भूस्खलन झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले. या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ता आहेत. मृतांची ओळख पटविण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.
A landslide took place yesterday around 1900 hours at Chatten, North Sikkim which damaged the nearby habitat. Three bodies have been recovered, which include combatants. More are suspected to be missing. Process for identification of the deceased and search operations is in…
— ANI (@ANI) June 2, 2025
सिक्कीममध्ये १५०० पर्यटक अडकले Sikkim Army Camp Landslide।
उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की लोचन आणि लाचुंग भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत.
मंगन जिल्ह्याचे एसपी सोनम देचू भुतिया यांनी सांगितले की, लाचेनमध्ये 115 आणि लाचुंगमध्ये 1,350 पर्यटक मुक्कामी आहेत. भूस्खलनामुळे दोन्ही बाजूंनी रस्ते बंद झाले आहेत. सर्व पर्यटकांना सध्या त्यांच्या हॉटेलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.





