शिखांना विमान प्रवासात कृपाण घेऊन जाण्यास अनुमती

नवी दिल्ली – केंद्र सरकारने सोमवारी शीख प्रवाशांना विमानतळांवर कृपाण बाळगण्यास बंदी घालणारा आदेश मागे घेतला आहे.त्यामुळे त्यांना आता विमान प्रवासाच्यावेळी कृपाण जवळ बाळगण्यास अनुमती मिळाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे सदस्य मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमानतळावरील शीख कर्मचाऱ्यांना कामाच्यावेळी विमानतळावर कृपाण बाळगण्याची परवानगी दिली आहे.
प्रवाशांनाही ही अनुमती मिळाली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. कृपाण हे शस्त्र बाळगणे शिख धर्मात अनिवार्य असते. तथापि सुरक्षेच्या कारणास्तव गेली काही वर्षे शिखांना विमान प्रवासाच्यावेळी कृपाण जवळ बाळगण्यावर बंदी होती.तथापि या संबंधात काही निर्बंध लागू राहणार आहेत.
त्यानुसार शीख प्रवाशांकडून बाळगल्या जाणाऱ्या कृपाणच्या ब्लेडची लांबी 15.24 सेमी (6 इंच) पेक्षा जास्त नसावी आणि कृपाणची एकूण लांबी 22.86 सेमी (9 इंच) पेक्षा जास्त नसावी,नागरी हवाई वाहतूक खात्याचे महासंचालक जयदीप प्रसाद, महासंचालक,यांच्या आदेशानुसार,कृपाण वापराची अनुमती केवळ देशांतर्गत प्रवासासाठीच आहे.





