करोनाबाधित मृत्यू दरात लक्षणीय घट

नवी दिल्ली : करोनामुळे मरण पावणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटत आहे. सध्या ते 2.49 टक्के आहे. जगात ते सर्वात कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांतून रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांचे योग्य व्यवस्थापन केल्याने मृत्यू दर घटला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परिणामकारक प्रतिबंधात्मक क्षेत्र, आक्रमक चाचण्या आणि आदर्श वैद्यकीय व्यवस्थापन आचारसंहिता यामुळे हा बाधित-मृत्यूदराचे प्रमाण घटले आहे. या महिन्याच्या सुरवातीला हा दर 2.82 टक्के होता. तो 10 जुलैला 2.72 टक्‍क्‍यांवर घसरला. आणि आता तो 2.49 टक्‍क्‍यापर्यंत कमी झाला आहे.

अनेक राज्यांनी धोका असणारे ओळखून काढण्यासाठी जनगणनाही केली आहे. त्यामुळे अती धोकादायक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे तांत्रिकदृष्ट्या शक्‍य झाले आहे. बाधिताची लवकर ओळख पटवणे, त्याच्यावर वेळीच उपचार करणे शक्‍य झाल्याने हे यश मिळाले असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

आशा सेविका आणि एएनएम यांनी स्थलांतरीतांमध्ये जनजागृतीचे महत्वाचे कार्य केले आहे.अंदमान निकोबार बेटे, मणीपूर, मिझोराम, नागालॅंड आणि सिक्कीम येथे एकही बळी अद्याप गेला नाही याकडे या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

मृत्यू दर राष्ट्रीय दरापेक्षा कमी असणारी राज्ये
त्रिपुरा (0.19), आसाम(0.23), केरळ (0.34), ओडिशा (0.51), गोवा (0.60), हिमाचल प्रदेश (0.75), बिहार (0.83), तेलंगणा (0.93), आंध्र प्रदेश (1.31), तामिळनाडू (1.45), चंदिगढ (1.71), राजस्थान (1.94) कर्नाटक (2.08) आणि उत्तर प्रदेश (2.36)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.