Cricket : फिरकीविरोधात सचिन-जयसूर्या यांच्यापेक्षा सिद्धू होता सर्वोत्तम : वसीम अक्रम

लाहोर – पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रम याने ९० च्या दशकात फिरकीपटूंविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाचे नाव जाहीर केले आहे. एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत वसीमने म्हटले आहे की, फिरकीविरोधात दिग्गज सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्या यांच्यापेक्षा नवज्योतसिंग सिद्धू सर्वात आक्रमकपणे खेळत असे. म्हणूनच मी त्याला फिरकीपटूंविरुद्ध सर्वोत्तम फलंदाज मानतो.
वसीमने सिद्धूबद्दल बोलताना सांगितले की, सिद्धू खूप जबरदस्त खेळाडू होता. मी कधीच त्याच्यासमोर गोलंदाजी केली नाही. तो खूप चांगला खेळायचा. पण मी नक्कीच म्हणेन की 90 च्या दशकात त्याच्यासारखा कोणीही नव्हता. तो एक उत्कृष्ट सलामीवीर फलंदाज होता.
दरम्यान, सिद्धूने भारतासाठी 51 कसोटी सामने खेळले ज्यात त्याच्या नावावर 3,202 धावा आहेत. सिद्धू कसोटीत 9 शतके आणि 15 अर्धशतकं झळकावण्यात यशस्वी ठरला. त्याने 136 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4,413 धावा केल्या होत्या. त्यात त्याने 6 शतके आणि 33 अर्धशतके झळकावली होती.





