नवी दिल्ली : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या पार्थिवाचे काल शवविच्छेदन करण्यात आले. त्यातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सिद्धू मुसेवाला यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर 19 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. तर शरीरात एक गोळी सापडली आहे. सिद्धू यांच्या खांद्यावर आणि मांड्यांवर जखमांच्या खुणा आढळल्याची माहिती पोस्टमार्टम अहवालातून समोर आली आहे.
दरम्यान, कॅनडास्थित एका टोळीने पंजाबचा लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गोल्डी बराड गैंगने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. गोल्डी बराड गैंगच्या पंजाब मॉड्यूलने ही हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
गोल्डी बराडचे खरे नाव सतींदर सिंग आहे. तो कॅनडात बसून आपली गैंग चालवतो. गोल्डी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गैंगशी संबंधित आहे आणि तो त्यांच्यासाठी काम करतो. वृत्तानुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सिद्धू मुसेवाला यांच्याव लक्ष ठेवले होते. बिश्नोई टोळीच्या विरोधी टोळीला मूसेवाला यांनी पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. आता पोलीस या दृष्टिकोनातूनही तपास करत आहेत. बिश्नोई टोळीच्या विरोधी टोळीला मूसेवाला यांनी पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कोण आहे लॉरेंस बिश्नोई?
लॉरेन्स विष्णोई स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ पंजाब युनिव्हर्सिटी नावाची संस्था चालवतात. पण पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये लॉरेन्स विश्नोई हे दहशतवादी नाव आहे. लॉरेन्सचे वडील लविंद्र कुमार, पंजाबमधील फाजिल्का येथील अबोहरचे रहिवासी आहेत, ते पंजाब पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनीच्या नावावर सुमारे सात कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
शिक्षणादरम्यान त्यांनी स्वत:ची विद्यार्थी संघटना स्थापन केली आणि त्यांच्या बॅनरखाली विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर उदय सेह आणि डग यांचा गट निवडणुकीच्या मैदानात होता, त्यामुळे लॉरेन्स निवडणुकीत पराभूत झाला. या पराभवानंतर फेब्रुवारी 2011 मध्ये चंदीगडच्या सेक्टर 11 मध्ये एके दिवशी लॉरेन्स आणि त्याचा विरोधी गट समोरासमोर आला. यादरम्यान लॉरेन्सने उदय साह यांच्या गटावर गोळीबार केला.
लॉरेन्सने गोळीबार करण्याची ही पहिलीच वेळ होती. दुसऱ्या बाजूनेही गोळीबार सुरू होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला तेव्हा लॉरेन्सचे नावही होते. लॉरेन्सच्या नावावर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा होता. तेव्हापासून लॉरेन्सवर सुमारे 50 खटले दाखल करण्यात आले असून, त्यापैकी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
2011 मध्ये फिरोजपूरमध्ये एका फायनान्सरसोबत दरोडा पडला होता, त्यात लॉरेन्सचे नाव पुढे आले होते, मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही. त्यानंतर फेब्रुवारी 2011 मध्ये त्याने आपल्या सहकारी विद्यार्थी नेत्यावर हल्ला केला तेव्हा त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तुरुंगात गेल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. यानंतर त्याला पुन्हा पॉइंट ५ बोअरचे पिस्तूल व काडतुसेसह अटक करण्यात आली. शिवाय, 12 ऑगस्ट 2012 रोजी लॉरेन्सविरुद्ध सेक्टर 34 पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दंगल आणि इतर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लॉरेन्स खून, दरोडे, खंडणी यांसारखे गुन्हे करत राहिला. तो तुरुंगात गेला आणि जामिनावर सुटला. 17 जानेवारी 2015 रोजी पंजाबचे खरर पोलीस त्याला न्यायालयात हजर राहण्यासाठी घेऊन जात असताना पोलिसांना चकमा देऊन तो पळून गेला होता. 4 मार्च 2015 रोजी फाजिल्का पोलिसांनी पुन्हा पकडले.
तुरुंगात राहून नेटवर्क चालवत असे
लॉरेन्स तुरुंगातच राहिला, पण तुरुंगात राहूनही तो आपले नेटवर्क चालवत राहिला आणि गुन्हे करत राहिला. लॉरेन्सने सीकरच्या माजी सरपंच, सरपंचाला फोन केला आणि त्याचा मोहाली शूटर रविंदर काझी याला 27 ऑगस्ट 2017 रोजी हत्येसाठी पाठवले. इतकंच नाही तर जोधपूरमध्ये आपली उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी लॉरेन्सने 17 सप्टेंबर रोजी जोधपूरचे व्यापारी वासुदेव इसरानी यांची हत्या करण्यासाठी त्याचे शूटर हरेंद्र जाट आणि रविंदर काझी या गुन्हेगारांना हत्येसाठी पाठवले.
काळविटाची शिकार केल्याबद्दल लॉरेन्स विश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामागेही एक कारण आहे. राजस्थानातील विष्णोई समाज काळ्या हरणाची पूजा करतो. काळ्या हरणाच्या हत्येप्रकरणी विष्णोई समाजही सलमान खानविरोधात खटला लढवत आहे. लॉरेन्स स्वतः विष्णोई समाजातून आलेला आहे. बरं, सध्या सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूमागे कोण आहे, हे तपासानंतरच कळेल. त्यांच्या निधनानंतर राजकारण आणि सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.