श्रावणी सोमवार: कोऱ्हाळे बुद्रुक येथील सिद्धेश्वर मंदिर

प्रतिनिधी: तुषार धुमाळ 

कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती येथील सिद्धेश्वर मंदिर पुरातन मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी व पांडवकालीन आहे. हे मंदिर पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधून पूर्ण केलेले आहे, अशी आख्यायिका आहे. या मंदिराला सोमेश्वर मंदिराचे प्रतिरुप मानले जाते.

श्रावण महिन्यामध्ये या मंदिरामध्ये अखंड नंदादीप तेवत असतात. श्रावण महिन्यामध्ये पंचक्रोशीतील नागरिक शिवलिंगाला पाणी घालण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावतात. ज्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये सोमेश्वर मंदिरांमध्ये सर्परुपी सोमनाथ देव प्रकट होतात तसेच या मंदिरांमध्येही सर्परुपी देव प्रकट होतात. या मंदिरांमध्ये श्रावण महिना महाशिवरात्र व इतर दिवशी धार्मिक कार्यक्रम होता असतात.

या मंदिराचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे हे मंदिर पूर्वाभिमुख असून या या मंदिराची रचना वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असून वर्षाखेरीस मंदिरांमध्ये सलग तीन दिवस उगवत्या सूर्याचा किरणोत्सव पहावयास मिळतो त्यावेळेस शिवलिंगावर ती पडणारी सूर्यकिरणे शिवलिंग सोनेरी करून टाकतात हा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.