कियाराला सिद्धार्थने ‘शेरशाह’ चित्रपटातील डायलॉग म्हणत केलं होत ‘प्रपोज’

Kiara Advani – अभिनेत्री कियारा अडवाणी आणि विकी कौशल या आठवड्यात डिस्ने प्लस हॉटस्टारच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये दिसले होते. यावेळी दोन्ही स्टार्सनी अनेक खुलासेही केले. करण जोहर आणि विकीच्या समोर पहिल्यांदाच कियाराने सिद्धार्थ मल्होत्राने तिला कसे प्रपोज केले होते ते सांगितले.
कियाराने सांगितले की, या प्रपोजलनंतर तिने करण जोहरलाही फोन केला आणि सर्वात आधी करणने तिला अंगठी दाखवण्यास सांगितले. कियाराने सांगितले की, ‘सिद्धार्थने दोन्ही कुटुंबांसोबत रोममध्ये सुट्टी घालवण्याचा प्लॅन केला होता, पण कोरोनामुळे त्याचे आई आणि वडील त्याला या व्हेकेशनमध्ये सामील होऊ शकले नाहीत. तिच्या चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल संपल्यानंतर कियाराने रोममध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या कुटुंबाची भेट घेतली.
कियारा जेव्हा मुंबईपासून 6000 किलोमीटर दूर रोमला पोहोचली तेव्हा तिने पाहिले की सिद्धार्थने तिच्यासाठी रोमँटिक कॅन्डल लाईट डिनरचा प्लॅन केला आहे. रात्रीच्या जेवणानंतर, त्याने तिच्या सोबत खूप साऱ्या गप्पा केल्या, नंतर शेरशाह या चित्रपटात विक्रम बत्रा डिंपलला जसे प्रपोज करतो तसेच सिद्धार्थ कियाराला प्रपोज करतो, तो म्हणाला, ‘मैं दिल्ली का सीधा साधा मुंडा हूं’ असे म्हणत त्याने तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला होता. प्रपोज करताना सिद्धार्थने तोच डायलॉग कियाराला बोलायला सुरुवात केली आणि ती जोरजोरात हसायला लागली. अंगठी घातल्यानंतर, हे जोडपे सिद्धार्थच्या कुटुंबाला भेटले, जिथे सिद्धार्थचे वडील, आई, मल्होत्रा कुटुंबातील भाऊ आणि बहीण सर्व उपस्थित होते. कियाराने तिच्या आयुष्यातील ही सुंदर गोष्ट करणसोबत शेअर केली आहे.





