Kiara Advani Post : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा यांचे निधन झाले. वडिलांच्या निधानाने सिद्धार्थ आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधानानंतर सिद्धार्थने वडिलांसाठी भावूक पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली होती. आता त्याची पत्नी कियारा अडवानी हिने देखील एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. कियाराने सासऱ्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ती नेहमी त्यांचे शब्द आणि शिकवण लक्षात ठेवेल. पोस्टसोबत कियाराने (Kiara Advani Post )इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सिद्धार्थ त्याचे वडिल सुनील मल्होत्रासोबत दिसतो, तर दुसऱ्या फोटोत सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा एकटे दिसतात. View this post on Instagram A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) या फोटोच्या खाली कियाराने अगदी सुरुवातीपासूनच तुम्ही माझे मोकळ्या हातांनी स्वागत केले. तुमच्या निस्वार्थ प्रेमाचा आम्हा सर्वांनाच आधार होता. तुमच्याकडून एक उदारपणा मिळत होता. तुमच्यामध्ये एक सहज सामंजस्यता होती. तुमच्या कुटुंबासाठीचे तुमचे प्रेम हे प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी होते. ते तुम्ही प्रत्येक वेळी दाखवूनही दिले. तुम्ही गोष्टी जाणीवपूर्वक ऐकायचात. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायची सवय होती. तुम्ही नेहमीच सगळ्यांना सढळ हस्ते कोणतीही अपेक्षा न करता देत राहिलात, अशा शब्दांत कियाराने आपल्या भावना पोस्टमध्ये व्यक्त केल्या. पुढे ती पोस्टमध्ये म्हणते, तुमच्या गोष्टी तुमचे हसू, तुमचे संस्कार आणि मऊ हृदय माझ्यासोबत कायम राहील. तुम्ही सौम्यता, संस्कार आणि एक प्रेमाचा वारसा मागे सोडला आहात तो नेहमीच तुमच्या मुलांमध्ये नातवंडांमध्ये आणि आमच्या सर्वांमध्ये राहील ज्यांना तुमची साथ लाभली. आता शांतपणे विश्रांती घ्या. आम्हाला तुमची नेहमीच आठवण येत राहील. आम्ही तुमच्यावर कायम प्रेम करू. तुम्ही आमच्या कायम स्मरणात राहाल. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा यांचे निधन झाले. अभिनेत्याने इंन्स्टाग्रामवरून वडिलांसोबतचे नऊ फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली होती. सिद्धार्थला त्याच्या वडिलांच्या जाण्याने खूप दुःख झाले आहे. त्याच्या पोस्टमधून त्याने वडिलांच्या आठवणींना उजाला दिला. हेही वाचा : Social Media Ban: देशात लहान मुलांच्या इंस्टाग्राम-फेसबुक वापरावर येणार बंदी? ; सरकारने बनवला प्लॅन