धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदी-तृप्ती डिमरी करणार रोमान्स; चित्रपट या तारखेला होणार रिलीज, हटके कॅप्शनने वेधलं लक्ष…

Dhadak 2 release date announced : ‘धडक’ या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाच्या सिक्वलची अर्थात ‘धडक २’ ची घोषणा करण्यात आली होती. आता यासंबंधीची एक मोठी अपडेट समोर आली असून, धडक २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धडक २ चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन करणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या अधिकृत इन्स्टावरून धडक २ चे लक्षवेधी पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
या चित्रपटात बॅालीवूडचा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी पाहायला मिळणार आहे. ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला धडक २ या चित्रपटाच्या निमित्ताने येणार आहे. धडकच्या दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन शायिजा इकबाल हिने केले आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट असणार आहे. या पोस्टरला हटके कॅप्शन देण्यात आले असून ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मरने और लड़ने में से एक को चुनना हो…तो लड़ना।” यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
हा धमाकेदार चित्रपट १ अॅागस्ट २०२५ रोजी थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रेमासाठीची लढाई पाहायला मिळणार आहे. यात कोणाचा विजय ठरतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. धडक २ हा धडक या हिट ठरलेल्या हिंदी चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. धडकमध्ये अभिनेता ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची जोडी पाहायला मिळाली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.





