श्वेता तिवारीच्या पुन्हा एकदा रंगल्या डेटींगच्या चर्चा;10 वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत जोडले नाव

Shweta Tiwari | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारीने अनेक मालिका आणि शोमध्ये काम केले आहे. श्वेता तिवारी नेहमीच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली आहे. वयाच्या चाळीशीनंतर देखील तिने स्वत:ला फिट ठेवले आहे. तिच्या फिटनेसचे आणि सौंदर्याचे अनेकांकडून कौतुक केले जाते. मात्र आता श्वेता तिवारी पुन्हा एकदा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.
श्वेता तिवारी तिच्यापेक्षा वयाने 10 वर्ष लहान असणाऱ्या अभिनेत्याला डेट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेता फहमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. फहमान खानला टीव्ही शो ‘मेरे डॅड की दुल्हन’मधून करिअरमधला पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. या शोमध्ये श्वेता तिवारी मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यावेळी तिचा दुसऱ्यांदा घटस्फोट झाला होता. Shweta Tiwari |
श्वेता तिवारीसोबतच्या अफेअरच्या बातम्यांबाबत फहमान खानने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत एकदा सांगितलं होतं की, ‘माझ्या प्रत्येक मालिकेमध्ये माझ्या रिलेशनशिपबद्दल अफवा पसरतात. मी आजपर्यंत कोणत्याही सह-अभिनेत्रीला डेट केलेलं नाही. माझं वैयक्तिक आयुष्य खूप वेगळं आहे.”
पुढे तो म्हणाला, “मला वाटते की, तुम्ही कामाच्या ठिकाणी तिथे नातेसंबंध निर्माण केले, तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. जेव्हा तुम्ही खरोखरच नातेसंबंधात असता आणि लोकांच्या लक्षात येते, तेव्हा तुम्ही थोडे जागरूक असता की कदाचित लोकांना ते कळेल, परंतु जर काही नसेल तर तुम्हाला जाणीव ठेवण्याची गरज नाही.” Shweta Tiwari |
View this post on Instagram
दरम्यान, श्वेता तिवारीचे पहिल्यांदा १९९८ साली राजा चौधरीसोबत लग्न झाले होते. अभिनेत्रीला राजापासून एक मुलगी आहे, तिचे नाव पलक तिवारी आहे. पलकने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान ‘या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी दुसरे लग्न केले दोघांना एक मुलगा असून ती अभिनवपासूनही विभक्त झाली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिच्या डेटींगच्या चर्चा रंगल्या आहेत. Shweta Tiwari |
हेही वाचा:
“कर्फ्यू, गोळ्या घालण्याचे आदेश… “; जाणून घ्या आरक्षणाच्या आगीत बांगलादेश का जळत आहे?





