श्वेता तिवारी वयाच्या ४४ व्या वर्षीही फिट; पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले सौंदर्य

Shweta Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या ४४ व्या वर्षीही फिट आणि स्टायलिश दिसते. आपल्या हटके लुकने ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच तिने खास अंदाजात फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
श्वेता तिवारीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पिवळ्या फुलांच्या ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. या आउटफिटमध्ये स्मार्ट कॉलर नेकलाइन आणि वरच्या भागात बारीक बटण डिटेलिंग होते. श्वेता तिवारीचा सिंपल लुक चाहत्यांना खूप आवडला आहे. श्वेता तिवारीच्या फ्लोरल ड्रेसमधील फोटोवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. Shweta Tiwari |
View this post on Instagram
दरम्यान, श्वेता तिवारीने अनेक मालिका आणि शोमध्ये काम केले आहे. श्वेता तिवारी नेहमीच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली आहे. श्वेताचे पहिल्यांदा १९९८ साली राजा चौधरीसोबत लग्न झाले होते. अभिनेत्रीला राजापासून एक मुलगी आहे, तिचे नाव पलक तिवारी आहे.
पलकने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान ‘या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी दुसरे लग्न केले दोघांना एक मुलगा असून ती अभिनवपासूनही विभक्त झाली आहे. Shweta Tiwari |
हेही वाचा :
खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत, पोलिसांकडून अटक; कट्टर विरोधक गिरीश महाजन म्हणाले…





