अहमदाबाद – आयपीएल 2023 चा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून आज दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा रंगत असून हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या गुजरात संघाने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलाच धोबीपछाड दिला आहे.
गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने अवघ्या 60 चेंडूत 129 धाव करत आयपीएल 2023 मधील तिसरे शतक झळकावले आहे. मुंबई इंडियन्सचा मागील सामन्यातील स्टार गोलंदाज आकाश मधवालने गिलला बाद केले असले तरी गिलने 129 धावांची खेळी करत मुंबईला अडचणीत आणले आहे.
दरम्यान, आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांसाठी महत्वाचा असून जो जिंकेल तो संघ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी कोणता संघ जातोय हे बघणं महत्वाचे ठरेल.