Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर स्वतः अभिनेता विकी कौशलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
‘छावा’ या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले होते. या सिनेमाचा ट्रेलर समोर आला असून, यामध्ये जबरदस्त ऍक्शन आणि ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळत आहेत.
छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर मराठ्यांचं स्वराज्य तितक्याच ताकदीने चालवणाऱ्या आणि औरंगजेबाला जबरदस्त लढा देणाऱ्या छत्रपती शंभू राजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा सिनेमा आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
आज संध्याकाळी ५.१५ वाजता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या, तर अभिनेता अक्षय खन्ना हा औरंगजेबच्या भूमिकेत दिसेल. तर सिनेमाला संगीतकार ए.आर रहमान यांचे संगीत लाभले आहे.