श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे मानाच्या तीन गणपतींना मानाचे ताट
Updated On:

वर्षानुवर्षे जोपासत आलेली प्रथा कायम
पुणे – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने प्रथेप्रमाणे यंदादेखील मानाच्या तीन गणपतींना मानाचे ताट देण्यात आले. यामध्ये पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतींचा समावेश आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे यांच्या हस्ते ताट देण्यात आले.
कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, केसरीवाडा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्याकडे हे मानाचे ताट सुपूर्द करण्यात आले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त मिलिंद सातव, सुरज रेणुसे आणि विनोद सातव यांसह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





