श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

आळंदी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (७५०) सण २०२४-२५ या महोत्सव बोधचिन्हाचे आज गुरुवारी (दि.१२ ) राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे शुभहस्ते राजभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आले.
यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त योगी निरंजन नाथ, प्र. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, प्रसिध्दी प्रमुख उमेश बागडे उपस्थित होते.
राज्यपाल यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनास येण्याची इच्छा व्यक्त केली व लवकरच संजीवन समाधी दर्शनास येणार असल्याचे सांगितले. प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी संस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी राज्यपाल यांना दिली.





