चिंबळीतील श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: २०० बैलगाड्यांची थरारक शर्यत!
Updated On:

चिंबळी- चिंबळी (ता. खेड, जि. पुणे) येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. मंदिराला भव्य विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. पहाटे काकड आरती, महापूजा आणि अभिषेकाने उत्सवाला सुरुवात झाली. सकाळी १० वाजता देवाच्या मानाच्या मांडव-डहाळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यंदाच्या उत्सवात बैलगाडा शर्यतीचा थरार चांगलाच रंगला. शर्यतीत २०० बैलगाड्यांनी सहभाग घेतला. या शर्यतीच्या घाटाचे उद्घाटन माजी सभापती, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विलास कातोरे यात्रा कमिटीचे अध्यक्ष, व सर्व संचालक यांच्या हस्ते झाले.





