Shreyas Iyer Reaction on PBKS Loss : आयपीएल २०२६ च्या ४९ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून ३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर प्रचंड निराश झाला आहे. हैदराबादने दिलेल्या २३६ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ अपयशी ठरला. सामन्यानंतर बोलताना अय्यरने पराभवाचे खापर खराब क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीवर फोडले असून आपल्याच खेळाडूंना घरचा आहेर दिला आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि वाढीव धावांचा फटका – श्रेयस अय्यरने सामन्यानंतर स्पष्ट शब्दांत सांगितले की, संघाने क्षेत्ररक्षणात कमालीची निराशा केली. “आम्ही सुरुवातीलाच खूप महत्त्वाचे झेल सोडले, ज्यामुळे हैदराबादच्या धावसंख्येत अतिरिक्त ३० ते ४० धावांची भर पडली. हे लक्ष्य आमच्या आवाक्याबाहेर जाण्याचे हेच मुख्य कारण होते,” असे अय्यर म्हणाला. खेळपट्टी जसजशी जुनी होत गेली तशी ती संथ होत होती आणि कटर गोलंदाजी तिथे प्रभावी ठरली असती, मात्र पंजाबचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ती आक्रमकता दाखवू शकले नाहीत. कूपर कोनोलीचे झुंजार शतक – 🚨 ANGRY STATEMENT BY SHREYAS IYER ON DEFEAT AGAINST SRH 🚨 Shreyas Iyer Said 🗣️, “Honestly, I’m very disappointed especially with our fielding. I’m really unhappy about it. On this pitch, it’s not possible to score that many runs if we don’t drop catches. But if we keep… pic.twitter.com/gqp1Rv1hiF — lndian Sports Netwrk (@IS_Netwrk29) May 6, 2026 या पराभवातही पंजाबसाठी एकमेव आनंदाची बातमी म्हणजे युवा फलंदाज कूपर कोनोलीची शतकीय खेळी. कोनोलीने १०७ धावांची नाबाद खेळी करत एकट्याने झुंज दिली. त्याच्या या खेळीचे कौतुक करताना अय्यर म्हणाला की, “कोनोलीचा खेळ आणि त्याची मानसिक वृत्ती (Mindset) अप्रतिम आहे. त्याच्याकडून इतर खेळाडूंनी शिकायला हवे.” दुर्दैवाने, दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ न मिळाल्याने कोनोलीचे हे पहिले आयपीएल शतक व्यर्थ गेले. हेही वाचा – Yuzvendra Chahal Vaping : मोठी बातमी! रियान परागनंतर आता युजवेंद्र चहल वादाच्या भोऱ्यात; विमानात ई-सिगारेट ओढतानाचा VIDEO व्हायरल नकारात्मकतेपासून दूर राहण्याचे आवाहन – सलग तीन पराभवांमुळे पंजाबच्या प्लेऑफच्या आशांना धक्का बसला आहे. या कठीण काळात संघातील खेळाडूंनी नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या कमतरतांवर काम करावे, असा सल्ला अय्यरने दिला. “जेव्हा तुम्ही हरता, तेव्हा नकारात्मक विचार करणे सोपे असते. पण आम्हाला पुन्हा त्याच मानसिकतेत यावे लागेल, ज्याने आम्ही स्पर्धेची सुरुवात केली होती,” असे त्याने निक्षून सांगितले. आगामी सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण आणि डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी सुधारली तरच पंजाबचे स्पर्धेतील आव्हान टिकून राहू शकेल