Shree Krishnajanmbhoomi । मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादाला आता एक नवीन वळण आले आहे. आज सर्वोच्च न्यायालयात याविषयी सुनावणी पार पडली. याविषयी न्यायालयाने “वादग्रस्त रचना ही एएसआय संरक्षित स्मारक आहे या हिंदू पक्षाच्या दाव्याची चौकशी केली जाईल. हिंदू पक्षाच्या वतीने वकील विष्णू जैन यांनी न्यायालयाला सांगितले की, वादग्रस्त वास्तू पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित केली जात आहे आणि त्यामुळे तेथे मशीद बांधता येणार नाही. या ठिकाणी पूजास्थळ कायदा लागू होत नाही. न्यायालयाकडून हिंदू पक्षाला नोटीस बजावली Shree Krishnajanmbhoomi । मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार यांच्या खंडपीठाने हिंदू पक्षाला नोटीस बजावली आहे. मुस्लिम पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला आव्हान दिले आहे ज्याने हिंदू पक्षाला त्यांचा खटला सुधारण्याची आणि ASI ला पक्षकार बनवण्याची परवानगी दिली होती. वादग्रस्त जागा एएसआय संरक्षित Shree Krishnajanmbhoomi । खंडपीठाने म्हटले की, वादग्रस्त जागा एएसआय संरक्षित आहे आणि ती मशीद म्हणून वापरता येत नाही या प्रश्नाबाबत, हे प्रकरण आमच्याकडे प्रलंबित आहे. आम्ही म्हटले होते की कोणताही अंतरिम आदेश देऊ नये आणि तरीही तुम्ही हे उच्च न्यायालयाला सांगितले नाही. तथापि, न्यायालयाने असेही म्हटले आहे की हिंदू पक्षाला खटल्यात सुधारणा करण्याची परवानगी देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय प्रथमदर्शनी योग्य असल्याचे दिसून येते. हेही वाचा दिल्लीच्या रेखा गुप्ता सरकारवर अरविंद केजरीवाल संतापले ; म्हणाले,”दहा वर्षांत आम्ही…”