Shraddha Kapoor: मुंबईत श्रद्धाचा ‘टुरिस्ट डे’! सेल्फी, स्ट्रीट शॉपिंग अन् चविष्ट जेवणाचा घेतला मनमुराद आनंद
Shraddha Kapoor श्रद्धाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुंबईतील या खास दिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या पोस्टमधून तिने मुंबईकडे एका पर्यटकाच्या नजरेने पाहण्याचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला.

Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या साध्या आणि मनमोकळ्या स्वभावामुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही ती अनेकदा आपल्या दैनंदिन आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता श्रद्धाने आपल्या नेहमीच्या आयुष्यापेक्षा काहीसा वेगळा अनुभव घेतला. चक्क आपल्या शहरातच तिने पर्यटक बनून मुंबईची सफर केली.
श्रद्धाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुंबईतील या खास दिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या पोस्टमधून तिने मुंबईकडे एका पर्यटकाच्या नजरेने पाहण्याचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला.
गाडीतून सेल्फीने झाली दिवसाची सुरुवात
श्रद्धाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुरुवातीला तिचा गाडीतील सेल्फी पाहायला मिळतो. गाडीत बसून मुंबईच्या रस्त्यांवरून प्रवास करताना तिने काही क्षण कॅमेऱ्यात कैद केले. यानंतरच्या एका फोटोमध्ये श्रद्धा एका रेस्टॉरंटमध्ये बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहे. तिच्यासमोर वेगवेगळ्या पदार्थांनी सजलेल टेबल पाहायला मिळते. विविध चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत श्रद्धाने आपल्या दिवसाचा आनंद घेतल्याचे या फोटोंमधून दिसते.
मुंबईच्या रस्त्यांचीही घेतली सफर
श्रद्धाने केवळ रेस्टॉरंटमध्ये वेळ घालवला नाही, तर मुंबईच्या रस्त्यांवरूनही फिरण्याचा आनंद घेतला. तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये गाडीतून मुंबईचा हायवे दिसत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच इमारती आणि शहराची गजबज पाहायला मिळते. मुंबईची ओळख असलेली ही धावपळ श्रद्धाने पर्यटकाच्या नजरेतून अनुभवली.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला असलेला कपड्यांचा बाजार पाहायला मिळतो. या बाजारात मोठी गर्दी दिसत असून नागरिक खरेदी करताना दिसत आहेत. मुंबईतील अशा रोजच्या गजबजलेल्या वातावरणाची झलकही श्रद्धाने चाहत्यांना दाखवली.
View this post on Instagram
स्वतःच्या शहरात पर्यटक होण्याचा अनुभव
या पोस्टची खास गोष्ट म्हणजे श्रद्धाने मुंबईतील अशीच ठिकाणे दाखवली आहेत, जी शहरातील नागरिक दररोज पाहतात. मात्र, एखाद्या पर्यटकाच्या नजरेने त्याच शहराकडे पाहिल्यास तेच रस्ते, बाजार आणि खाद्यपदार्थ वेगळेच वाटू शकतात.
श्रद्धाने फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना चाहत्यांना एक मजेदार प्रश्नही विचारला. “तुम्ही कधी आपल्या शहरात पर्यटक झाला आहात का?” असा प्रश्न तिने पोस्टच्या माध्यमातून विचारला. श्रद्धाच्या या पोस्टला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्रीने कोणत्याही मोठ्या पर्यटनस्थळाची सफर न करता आपल्या शहरातील साध्या गोष्टींचा आनंद घेतल्याचे चाहत्यांना विशेष आवडले.
मुंबईचा अनुभव वेगळ्याच अंदाजात
मुंबई हे श्रद्धाचे स्वतःचे शहर आहे. त्यामुळे या शहरातील रस्ते, गर्दी, खाद्यपदार्थ आणि बाजार तिच्यासाठी नवीन नाहीत. मात्र, रोजच्या धावपळीत आपण आपल्या आसपासच्या गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. श्रद्धाने मात्र याच परिचित मुंबईकडे पर्यटकाच्या नजरेने पाहत एक खास दिवस घालवला.
गाडीतून प्रवास, रेस्टॉरंटमधील जेवण, मुंबईचा हायवे आणि रस्त्याच्या कडेला असलेला बाजार, अशा साध्या गोष्टींची तिने आपल्या पोस्टमधून झलक दाखवली. त्यामुळे श्रद्धाची ही छोटीशी मुंबई सफर सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.





