Actress Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या सहज सुंदर अभिनयासाठी ओळखली जाते. श्रद्धा तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी क्वचितच तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतीच श्रद्धाने तिच्या इन्स्टावर एका कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. या ओळीतून प्रेमाची भावना प्रकट होते, असे या ओळी वाचल्यानंतर लक्षात येईल. अभिनेत्रीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. या ओळी कुणासाठी आहेत, असा प्रश्न चाहत्यांनी श्रद्धाला केला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती कुठेही असली तरी तिच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवरून ती चाहत्यांसोबत सतत कनेट असते. तिच्या व्यावासायिक आयुष्याशी संबधित ती अपडेट्स नेहमी शेअर करत असते. कधीकधी श्रद्धा काही मजेशीर फोटो आणि पोस्टही शेअर करत असते. तिच्या नव्या पोस्टली तिची क्रिप्टक पोस्ट असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता या पोस्टमधून श्रद्धाला नेमकं काय सांगायचे आहे असा प्रश्नही चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. “जेव्हा तू एकटी असशील मी तुझ्या शेजारी बसेन जेव्हा तू दुःखी असशील मी तुला माझ्या मिठीत घेईन मला माहित आहे की तू हरवशील मला माहित आहे की तू पळून जाशील पण मी तुला शोधेन आणि तुला धरून ठेवेन” या कवितेच्या ओळी श्रद्धाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केल्या आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की तिने ही कविता कोणासाठी लिहिली आहे? तिने ती का लिहिली आहे? असे प्रश्न काही नेटकऱ्यांना पडलेले आहेत. तर दुसरीकडे काही नेटकरी तिला खंबीर राहण्याचे सांगत आहे. हेही वाचा : Actress Ileana D’Cruz : दुसऱ्यांदा आई झाली इलियाना डिक्रूझ; इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आनंदाची बातमी