Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनयासह तिच्या सौंदर्यामुळे लोकप्रिय आहे. तिच्या साधेपणासह मराठमोळ्या अंदाजासाठी तिला मोठी पसंती मिळते. अलीकडेच तिचा ‘स्त्री 2’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. यानंतर चाहते देखील तिच्या आगामी चित्रपटाबाबची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील काही दिवसांपासून ‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक आणि एकता कपूरच्या ‘हाय-कॉन्सेप्ट थ्रिलर’ चित्रपटासाठी तिचे नाव चर्चेत होते. मात्र, आता श्रद्धा कपूरने या चित्रपटातून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. मानधनावरून निर्माण झालेल्या वादामुळे तिने माघार घेतल्याचे म्हंटले जात आहे. श्रद्धाने चित्रपटासाठी 17 कोटींचं मानधन आणि चित्रपटाच्या होणाऱ्या नफ्यात थोडा हिस्सा मागितला होता. एकता कपूरला ही रक्कम प्रोजेक्टच्या बजेटच्या तुलनेत खूपच जास्त वाटली. निर्मात्यांना बजेट मर्यादेत ठेवणे गरजेचे वाटत असल्याने दोघांमध्ये सहमती होऊ शकली नाही. त्यामुळे श्रद्धाने हा प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेतला. Shraddha Kapoor | चित्रपटातून श्रद्धा बाहेर पडल्यावर आता निर्माते दुसऱ्या अभिनेत्रीसोबत संपर्क साधत आहेत. या भूमिकेसाठी तापसी पन्नू, मृणाल ठाकूर आणि सारा अली खान यांची नावे चर्चेत आहेत. Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती स्त्री 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव, अपरशाकती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी सारख्या कलाकार आहेत. हेही वाचा: नागपूरमधील तिरंगा रॅलीतून फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा, “जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी…”