अभिनेत्री श्रद्धा कपूरने ‘त्या’ बाबतीत पंतप्रधान मोदींना टाकलं मागे

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला असून सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बाकी चित्रपटांना मागे टाकत ‘स्त्री 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे. स्त्री 2 हा चित्रपट हिट झाल्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झाली आहे. तिने चक्क या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागे टाकले आहे.
श्रद्धा कपूरच्या लोकप्रियतेमध्ये वाढ
‘स्त्री 2’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत श्रद्धा कपूरने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मागे टाकलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागे टाकत श्रद्धा कपूर इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत तिसरी सर्वाधिक फॉलोअर भारतीय व्यक्ती बनली आहे.
भारतातील टॉप इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली, दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आणि तिसऱ्या क्रमांकावर श्रद्धा कपूर आहे. तिला लवकरच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. श्रद्धा कपूरचे इंस्टाग्रामवर 91.5 मिलियन फॉलोअर्स आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंस्टाग्रामवर 91.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.





