Shraddha Kapoor : हॅारर कॅामेडी युनिव्हर्समध्ये आता आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. मुंज्या फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. कालच या चित्रपटाचा ट्रेलर लॅान्च सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला बॅालिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने देखील हजेरी लावली होती. यावेळी तिने एक खास गुडन्यूज शेअर केली. श्रद्धाने बॉलिवूडची लोकप्रिय हॉरर-कॉमेडी फ्रेंचायझी ‘स्त्री’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली. या हिट चित्रपटावर आधारित छोटी स्त्री नावाचा एक अॅनिमेटेड चित्रपट लवकरच थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. थामा चित्रपटाच्या ट्रेलर लॅान्च सोहळ्यात तिने ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट स्त्री ३ सोबत जोडला जाणार असल्याचे मॅडॅाक फिल्म्सचे दिनेश विजयन यांनी सांगितले. यामुळे ही बातमी स्त्री चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हॅारर कॅामेडी युनिव्हर्समधील स्त्री हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षंकाचा तुफान प्रतिसाद मिळाला. यानंतर रुही, भेडीया, मुंज्या, स्त्री २ या चित्रपटांवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता याच हॅारर कॅामेडीचा भाग असलेल्या थामा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर लॅान्च सोहळ्याला अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती. ती खूप सुंदर दिसत होती. तिने लाल रंगाची साडी नेसली होती, तर स्त्री चित्रपटात तिच्या केसांची वेणी दाखविण्यात आली होती, त्याच लूकमध्ये ती कार्यक्रमाला उपस्थित होती. दरम्यान, मॅडॉक फिल्म्सच्या ‘थामा’ चित्रपटात आयुषमान खुरानासोबत रश्मिका मंदान्ना, नवाजुद्दीन सिद्दिकी आणि परेश रावल प्रमुख भूमिकेत आहेत. ‘मुंज्या’ फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी थामा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २१ अॅाक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा : आता हर्षवर्धन पाटलांची जबाबदारी वाढली! ‘या’ बालेकिल्ल्यात सत्ता आणण्यासाठी शरद पवारांनी टाकला मोठा डाव