पिंपरी | मतदान केल्याची निशाणी दाखवा फीमध्ये सवलत मिळवा

पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकशाहीचा आत्मा असणारा मतदार हा खरा घटक आहे. मतदानाचा टक्केवारी वाढवण्यासाठी व मतदार जागृत व्हावा, यासाठी भोसरीतील कायदेतज्ज्ञ एडवोकेट बाळासाहेब थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीतील वकिलांनी एकत्र येऊन आपल्या शुल्कामध्ये भरघोस सवलत देण्याचे घोषित केले आहे. ही सवलत मतदारांनी आपण मतदान केल्याची निशाणी दाखवत या सवलतीचा फायदा घ्यावा. तसेच या सवलतीचा फायदा 13 ते 20 मे या कालावधीमध्ये घेता येणार आहे.
भोसरी परिसरातील वकिललांनी एकत्र येत हा उपक्रम राबवणार आहेत. ॲड. बाळासाहेब थोपटे ,ॲड.संदेश थोपटे, ॲड. किशोरी देशमुख, एड.गोविंद वाघ, ॲड.अर्चना जाधव , ॲड. कृष्णा गोटमवाड, ॲड. अनिता गवई,
अड.आशा मुंंडे,ॲड. प्राजक्ता थोपटे, अॅड. अश्विनी गायकवाड, अॅड.नुपूर बोरा या वकिलांच्या सहकार्याने ही सवलतीची योजना राबविण्यात येणार आहे. मतदार जागृतीसाठी शासन, महानगरपालिका स्तरावर अनेक उपक्रम राबवले जात आहेत. भोसरी,, मोशी, चिखली व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी या सवलतीचा फायदा घ्यावा व मतदार प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.





