“याचा फोन फोडू का?” सई ताम्हणकर फोटोग्राफरवर संतापली

Sai Tamhankar| अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत देखील यशस्वी कामगिरी केली आहे. सईने चिटपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्रामवर कपिल कारंडे या पापाराझी फोटोग्राफरने सईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, फोटोग्राफर सईला म्हणतो की, ‘मॅम तुमचा आजच एक मुव्ही मी पाहिला मितवा’. त्यावर सई म्हणते , ‘याचा फोन फोडू का मी? मी मितवा सिनेमात नाही’.
यावर सई त्याचा फोन खेचून घेते आणि त्याचेच शूटिंग करू लागते. यावर सई त्याला ‘सांग मी कोणत्या सिनेमात होते?’ असं विचारते. यावर तो म्हणतो ‘स्वप्नील जोशीसोबत तुम्ही त्या सिनेमात होता, त्याच्या बायकोचं काम केलं आहे….’ हा व्हिडीओ कपिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शन देत लिहले की, “खरंतर मला ‘तू ही रे’ सिनेमाबद्दल बोलायचं होतं. हा फोटोग्राफर सईला ‘मितवा’ची अभिनेत्री समजला होता.
View this post on Instagram
एवढेच नाही तर कपिलनं व्हिडिओ शेअर केल्यावर त्यावर सईनं कमेंटही केली आहे. सईनं लिहलं, ‘अगदी बरोबर, तू ही रे… आता कसं आठवलं?’. तर यावर कपिलं कमेंटमध्ये उत्तर देत लिहलं, ‘आधीच आठवलं होतं मॅम, पण सुंदर सईला पाहून सर्वकाही विसरायला झाले.’ यावर सईही त्याला ‘चल चल’ असे म्हणते. दरम्यान, सई लवकरच ‘डब्बा कार्टेल’ या नेटफ्लिक्सच्या हिंदी सीरिजमध्येही दिसणार आहे.





