Ayesha Jhulka : ‘जो जिता वही सिकंदर’मुळे मिळाली ओखळ! दोन प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत नाव जोडलं गेलं; अभिनत्रीने उद्योगपतीशी थाटला संसार
Ayesha Jhulka : आज अभिनेत्रीचा ५४ वा वाढदिवस असून तिचे चाहते तिला सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत.

Ayesha Jhulka : ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आयेशा झुल्का. या अभिनेत्रीने अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर अचानक इंडस्ट्रीमधून एक्सिट घेतली. आज अभिनेत्रीचा ५४ वा वाढदिवस असून तिचे चाहते तिला सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत.
खरंतर एककाळी या अभिनेत्रीने एकामागून एक हिट सिनेमे दिले. तिच्या अभिनयाची चर्चा झाली. तसेच तिच्या अफेअरच्या चर्चा लाइमलाईटच्या दुनियेत रंगत होत्या. अभिनेत्रीचं अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांच्यासोबत नाव जोडलं गेलं होतं. पण अभिनेत्रीने या चर्चा खंडन करून फेटाळून लावल्या. त्यानंतर अभिनेत्रीने उद्योगपती समीर वाशी यांच्याशी २००३ मध्ये विवाह केला. (Ayesha Jhulka )
अशी झाली अभिनयाची सुरूवात (Ayesha Jhulka )
२८ जुलै १९७२ रोजी श्रीनगर येथे जन्मलेल्या आयेशा झुल्काने १९८३ मध्ये ‘कैसे कैसे लोग’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर १९९० मधील तेलुगू चित्रपट ‘नेती सिद्धार्थ’मधून ती मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. त्यानंतर तिने बॅालिवूडमध्ये पाऊल टाकलं. ‘जो जीता वही सिकंदर’, ‘खिलाडी’, ‘रंग’, ‘संग्राम’, ‘वक्त हमारा है’ असे अनेक हिट सिनेमे दिले. तिची अक्षय कुमारसोबत असलेली अॅानस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीपैकी एक होती.
…तर या दोन हिट सिनेमातही आयशी दिसली असती (Ayesha Jhulka )
अनेक हिट सिनेमांमधून अभिनेत्रीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच तिने बॉलिवूडपासून अचानक दूर जाण्याचा मोठा निर्णय घेत चाहत्यांना धक्का दिला. बॅालिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर तिला अनेक सिनेमांच्या अॅाफर्स मिळाल्या होत्या. त्यापैकी तिने अनेक अॅाफर्स नाकारल्या. त्यातील काही सिनेमे पुढे जाऊन हिट ठरले. यामध्ये ‘फूल और कांटे’ आणि ‘रोजा’ या दोन सिनेमांचाही समावेश होता.
अक्षय कुमारसोबत जोडलं गेलं नाव

अक्षय कुमारसोबत जोडलं गेलं नाव
१९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटामुळे आयेशाला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘खिलाडी’, ‘संग्राम’, ‘रंग’, ‘डाळाल’, ‘चाची ४२०’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या. ‘खिलाडी’च्या चित्रीकरणादरम्यान तिचं नाव अक्षय कुमारसोबत जोडलं गेलं. दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर आयेशा झुल्काचे नाव अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबतही चर्चेत आले. ‘आंच’ आणि ‘आज की आवाज’ या सिनेमांच्या दरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आयेशाने या सर्व अफवांचे खंडन केले.
स्वेच्छेने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला
२००३ मध्ये आयेशाने उद्योगपती समीर वाशी यांच्याशी विवाह केला. सध्या ती पतीसोबत मुंबईत वास्तव्यास असून अभिनयापेक्षा व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. २०२३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिला मनासारख्या भूमिका मिळत नव्हत्या. त्यामुळेच तिने स्वेच्छेने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आजही तिच्या चाहत्यांमध्ये तिची लोकप्रियता कायम असून, ९० च्या दशकातील यशस्वी अभिनेत्री म्हणून तिची ओळख कायम आहे.
Immunity Boost: रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे? मग रोजच्या आहारात करा या ‘५’ औषधी पानांचा समावेश!





