बारामती । माळेगावात रविराज तावरे यांच्यावर गोळीबार; तालुक्यात एकच खळबळ
Updated On:

बारामती ( प्रतिनिधी) – पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना तालुक्यातील माळेगाव येथील संभाजीनगर येथे सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. रविराज तावरे यांच्यावर बारामती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात इसमांनी गोळीबार केला असून याबाबत तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे.





