विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या

झारखंड – विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना झारखंडची राजधानी रांची मध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुकेश सोनी असे हत्या करण्यात आलेल्या नेत्याचे नाव असून खलारी येथील महावीर नगरमध्ये राहत होते. ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे खलारी ब्लॉक अध्यक्ष होते. ही घटना खलारी पोलिस स्टेशन हद्दीतील मॅक्क्लस्कीगंजजवळ घडली आहे.
मुकेश सोनी यांचे प्रधान ज्वेलर्स नावाने दांगिन्यांचे दुकान होते. मॅक्लुस्कीगंज येथील धुर्वा मोरजवळ असलेले आपले दुकान बंद करून संध्याकाळी मुकेश घरी जात होते. दरम्यान, बकुळीया तांडजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. लोकांनी जखमी मुकेश सोनी यांना तातडीने येथील डाक्रा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढिल तपास पोलिस करत आहेत.





