धक्कादायक ! परदेशातून आलेले करोनाबाधित विमानतळावरून पळाले
Updated On:

नवी दिल्ली – इटलीवरून भारतात परतलेले, संस्थात्मक विलगीकरणात असलेले 13 करोनाबाधित रुग्ण पळून गेल्याची घटना अमृतसरमध्ये घडली आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे. यापैकी 9 जण विमानतळावरूनच पळाले असून 4 जण स्थानिक रुग्णालयातून पळून गेले आहेत.
विमानतळावरून पळून गेलेले 9 जण कसे पळून गेले याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र जे जण रुग्णालयातून पळून गेले त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना फसवून तिथून पळ काढला आहे.
पळून गेलेल्या सर्वांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. अमृतसरचे पोलीस उपायुक्त गुरप्रीतसिंग खेहरा म्हणाले की, जर हे पळून गेलेले लोक सकाळपर्यंत परत आले नाहीत, तर त्यांचे फोटो वर्तमानपत्रात छापले जातील आणि त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल





