धक्कादायक! शिक्षकांकडूनच मूकबधिर मुलींचे लैंगिक शोषण

पंढरपूर – गुरु आणि शिष्याचे नाते हे सर्वात मोठे समजले जाते. पण याच नात्याला काळिमा फासणारी घटना पंढरपूर मध्ये घडली आहे. पंढरपूर मधील निवासी मूकबधिर शाळेतील चार मुलींचा लैंगिक छळ शिक्षकाने केला असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पंढरपूर उपविभागीय पोलिसांच्या दामिनी पथकाने शाळेला भेट दिल्यानंतर मुलींनी खाणाखुणा करून चुकीच्या पद्धतीने शिक्षकाकडून स्पर्श होत असल्याची तक्रार केली आहे. यानंतर पोलिसांनी मूकबधिर भाषा ओळखणाऱ्या व्यक्तीला घेऊन मुलींचा जबाब नोंदवून घेतला असता, धक्कादायक माहिती मिळाली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अर्जुन सातपुते, ज्ञानोबा म्हस्के, संतोष कुलाल आणि सिद्धेश्वर वाघमोडे या शिक्षकांना ताब्यात घेतेले आहे. न्यायालयाने या चार जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.